करमाळा प्रतिनिधी

झरे विद्यालयाच्या वतीने नुतन अधिकाय्रांचा सन्मान
झरे विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. सोनल प्रकाश बैरागी हिची एम बी बी एस साठी शासकीय महाविद्यालयात निवड झाल्याबद्दल व कु. प्रांजली प्रकाश कदम हिची पुणे ग्रामीण मधुन पोलीस सेवेमध्ये निवड झाल्याबद्दल नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे विद्यालयाच्या वतीने श्रीमती बिले मॅडम,श्रीमती घाडगे मॅडम,श्रमती राजमाने मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी दोघींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटीचे महत्त्व पटवून सांगितले

कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक घाडगे सर सहशिक्षक चव्हाण सर खाडे सर मुटके सर घोरपडे सर, ज्ञानेश्वर घाडगे सर उपस्थित होते.
