करमाळा प्रतिनिधी

ज्योतिर्लिंग मंडळ कुंभेज च्या वतीने माजी सैनिक व नवनियुक्त अधिकाय्रांचा सन्मान
ज्योतिर्लिंग मंडळ कुंभेज चा वतीने १९९९च्या कारगील युध्दात सहभागी झालेले अक्रुर शिंदे मेजर तसेच १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युध्दात सहभागी झालेले मोहन मुटके, जालिंदर कन्हेरे यांनी सहभाग घेऊन देश सेवा यशस्वी पणे बजावली त्या बद्दल त्यांना सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले तसेच सरळ सेवेतून कुमारी काजल किसन शिंदे हिची

कालवा निरीक्षक म्हणून व कुमारी प्राची मोहन कादगे हिची नागपूर शहर पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना ही मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माजी सैनिक बाळासाहेब शिंदे मेजर, बिभीषण अण्णा कन्हेरे, देवराव शिंदे मेजर, सुभाष मुटके मेजर
मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव इतर सर्व सदस्य हजर होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मुटके सर यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश शिंदे यांनी मानले.
