जुनी करमाळा नगरपालिकेत घारीचा पावन गणपती

करमाळा प्रतिनिधी 

जुनी करमाळा नगरपालिकेत घारीचा पावन गणपती आहे सदरची मूर्ती स्वयंभू असून जुने करमाळा पालिकेचे बांधकाम करीत असताना ही मूर्ती मिळाली18 67 पूर्वीचे आहे असे सांगण्यात येते .याची स्थापना राजेरावरंभा यांच्या कालखंडात झालेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गणेश उत्सव साजरी करीत आहे श्री गणेशाची अथर्व सूक्त इथे पाठ पठण केले जाते करमाळयातील श्री कमला भावना देवीच्या पाठोपाठ या घारीचा पावन गणपतीचे फार मोठे अधिष्ठान आहे संकष्ट चतुर्थी ,गणेश चतुर्थी या दिवशी अनेक भाविक भक्त हजारोंच्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतात व आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात गणेश उत्सवाच्या काळात सकाळी संध्याकाळी गणेशाची आरती पाठ नियमित होते तसेच अनंत चतुर्थी दिवशी श्रीदेवीचा माळावरील राजेरावरंभा जगदंबा देवस्थान यांच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन होते सदर गणपती नवसाला पावणारा आहे त्यामुळे या घारीच्या गणपती शेजारी अजून एक विसर्जनासाठी इथे गणपती दुसरा आणला जातो व दोन्ही गणपतीची पूजा विधिवत गणेशोत्सव काळात केली जाते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *