शोभा फाऊंडेशन तर्फे नटराज लोकनाट्य कलाकेंद्र जामखेड येथे राखीपौर्णिमा सण उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी

शोभा फाऊंडेशन ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत नवीन नवीन उपक्रम सतत राबवत असते. सध्या संस्थेमार्फत इंदापूर जिल्हा पुणे याठिकाणी मागील 5 वर्षापासून व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात आतापर्यंत 3000 हून अधिक व्यसनाधीन पीडितांवर उपचार करण्यात आले आहेत. संस्थेमार्फत महिला सबलीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. असाच एक उपक्रम शोभा फाऊंडेशन तर्फे जामखेड येथील नटराज या कलाकेंद्रात राखीपौर्णिमा निमित्त संस्थेचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना, समाजात वावरताना कला केंद्रातील मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन हा एक वेगळ्याच नजरेचा असतो. परंतु त्याही एक स्त्रिया आहेत त्यांनाही भावना आहेत आणि याच भावनेतून समाजाचा ही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून आज त्यांच्या सानिध्यात राखीपौर्णिमा साजरा करुन एक चांगल्या विचारांचं रोपटे लावण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत असे मनोगत शोभा फाऊंडेशन चे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी व्यक्त केले. उपस्थितांचे आभार कला केंद्राचे संचालक संतोष पवार यांनी मानले. आभारपर मनोगतात संतोष पवार म्हणाले की, अशा पद्धतीने राखीपौर्णिमा हा सण पहिल्यांदाच जामखेड मधील कला केंद्रात साजरा होत आहे. शोभा फाऊंडेशनने एक चांगली सुरुवात जामखेड मधील कला केंद्रात चालू केली येणार्‍या काळात नक्कीच यासारखे चांगले उपक्रम याठिकाणी पार पडतील अशी आशा करतो.
या कार्यक्रमाचे नियोजन कला केंद्राचे संचालक कृष्णा जाधव यांनी केले होते. यावेळी मोठय़ा संख्येने महिला तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *