
करमाळा प्रतिनिधी
झरे गावातील दोन होतकरु तरुणींनी घरातील परिस्थिती मेटाकुटीची असताना स्वः बळावर झरे गावाचे व आईवडिलांचे नाव लौकिक केल आहे. सत्कार करताना सोनल प्रकाश बैरागी हिने सिद्ध करुन दाखवल की शिकण्याची जिद्द व चिकाटी असेल तर व्यक्ती काही करु शकते. तिने अभ्यासाच्या जोरावर मुंबई सारख्या उच्च कॉलेज मध्ये मिरीटच्या जोरावर M.B.B.S ला अँडमिशन मिळवले आहे व आपल्या आईवडिलांचे नाव कमवले आहे.

झरे गावाच्या पोलिस पाटिल कल्याणी विकास आमृळे यांच्या हस्ते सत्कार केला. प्रांजली प्रकाश कदम यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुण्यामध्ये “पुणे ग्रामीण पोलिस” येथे त्यांची निवड झाली आहे. यासाठी या दोघींचा विकास (दादा) आमृळे मिञ परिवार व झरे ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चौधरी, सतिश गवळी, विष्णु गायकवाड, वि.का.स.से.संस्था झरे सदस्य भानुदास बोराटे, पांडुरंग मावलकर, प्रकाश कोकाटे, महादेव कोकाटे, बापु कदम, कैलास मिटे, प्रकाश कदम, अप्पा पिसाळ, बबन कोकाटे, श्रीहरी कोटावळे, लक्ष्मण गुटाळ, तात्यासाहेब चौधरी, शरद गायकवाड, ओंमकार कदम, सागर आमृळे, कल्याण आमृळे, महेश आमृळे,तात्यासाहेब चौधरी, विकास आमृळे आदीजण उपस्थित होते.
