करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळामध्ये चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या प्रशालेचे खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. करमाळा येथे पार पडलेल्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत न्यू इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

तिहेरी उडी (मुली) स्पर्धेत अंकिता संतोष शिंदे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, तिहेरी उडी (मुले) स्पर्धेत श्रेयस धनेश्वर सरडे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, गोळा फेक (मुली) स्पर्धेत सिद्धी नागनाथ लबडे हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, हातोडा फेक (मुले) स्पर्धेत संकेत शिवाजी लोखंडे याने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला, 4*400 मीटर रिले (मूले)- तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

यावेळी तिहेरी उडी व गोळा फेक या स्पर्धेतील खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना क्रीडा शिक्षक योगेश शेवाळे यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्व विजेत्यांना तालुका क्रिडा समन्वयक प्रा. राम काळे सर यांच्या हस्ते मेडल दिले गेले. न्यू इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रिजेश बारकुंड, चिखलठाण चे सरपंच विकास बापू गलांडे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, मुख्याध्यापक आनंद कसबे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *