करमाळा प्रतिनिधी
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. तसेच अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जन करण्यात येते. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच जण अतिशय उत्सुक असतात. हा सण पूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
त्याच प्रमाणे अगदी थाटामाटात स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सुध्दा श्री गणेशाचे आगमन झाले. स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी मिळून इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली. शाडूच्या मातीची मूर्ती बनवून स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी अगदी सुबक नक्षीकाम केलेली श्री गणेशाची मूर्ती तयार केली. पर्यावरण पूरक अशी मातीची मूर्ती बनवण्यात आली. या साठी सर्व विदयार्थी,शिक्षक यांनी परिश्रम घेतले.