करमाळा प्रतिनिधी

गणपती बाप्पाचे दिनांक १७ रोजी विसर्जन होणार आहे. करमाळा शहरातील सर्व ठिकाणचे घरगुती व सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नगरपालिका जो खड्डा तयार करते तो न करता प्रांत अधिकाऱ्यांनी नगरपालिकेस करमाळा शहरातील एखादी खाजगी विहीर अधिग्रहण करून देण्यात यावी विसर्जन झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्या विहिरीची स्वच्छता नगरपरीषदे कडून करून घ्यावी. यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही. शहरातील काही मंडळाचे व घरगुती गणपती पाचव्या व सातव्या दिवशी पडतात. त्यामुळे लवकरात लवकर विहीर अधिग्रहण करून द्यावी. अशी मागणी युवा सेना करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  या निवेदनावर युवा सेना उपजिल्हा प्रमुख मयुर यादव, तालुका प्रमुख शंभुराजे फरतडे, युवा सेना शहर प्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, युवा सेना उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, अनिकेत केंगार, अजय साने, महेश घाडगे, सौरभ माने, अक्षय घाडगे, अविनाश घाडगे, गणेश राखुंडे, शुभम क्षीरसागर, स्वप्निल ननवरे, किशोर पवार यांच्या सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *