करमाळा प्रतिनिधी
गेल्या वर्षी असमाधान कारक पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठा कमी झाला होता. त्यामुळे करमाळा शहरात मागील काही महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाकडून 3-4 दिवसातून एकदा शहराला पाणी पुरवठा केला जात होता आता 2 दिवासून एकदा पाणी पुरवठा केला जातो.
या वर्षी सगळीकडे समाधान कारक पाऊस झाला आहे. उजनी धरण देखील 100% पेक्षा जास्त झाले आहे. आता सणा सुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची विनाकारण धावपळ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने शहराला पूर्वी प्रमाणे दररोज पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.