करमाळा प्रतिनिधी

        आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एक व दोन येथील विकास कामासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती नगरसेवक संजय सावंत यांनी दिली.

         यावेळी सावंत म्हणाले की, प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामासाठी सावंत गल्ली येथे नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेत बाग विकसित करणे व खेळणी बसवणे ओपन जिम साहित्य बसविणे  तसेच मोहल्ला गल्ली येथील सर्व बोळामध्ये काँक्रिटीकरण करणे व संभाजीनगर परिसरात गटार बांधकाम करणे व रस्ता काँक्रीटकरण करणे या सर्व विकास कामाची लवकरच निविदा निघून कामास प्रारंभ होईल असे ते यावेळी म्हणाले.

      सदर विकास काम मंजूर झाल्याबद्दल दोन्ही प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *