करमाळा प्रतिनिधी

जेऊर मध्य रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा देण्याबाबत केलेल्या विनंतीला यश मिळाले असून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आपले शिफारस पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचित केले असून थोड्या दिवसात या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना जेऊर येथे निश्चितपणे थांबा मिळणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मीदिदी बागल यांनी आज येथे दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. याबाबत अधिक

माहिती देताना रश्मीदीदी बागल म्हणाल्या की, जेऊर हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असून येथे प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते. जेऊर रेल्वे स्टेशनशी आसपासच्या सुमारे 50 ते 60 गावांचा संपर्क येतो. विविध गावचे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, शासकीय अधिकारी दररोज पुणे, सोलापूर, दौंड, कुर्डूवाडी, बेंगलोर इंदोर, भोपाळ, नागपूर, भुसावळ, मुंबई, चेन्नई, तिरुपती, गुंटक्कल या ठिकाणी कामानिमित्त ये जा करत असतात. त्यांच्या सोयी करता हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना जेऊरला थांबा मिळण्याबाबत प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती. या मागणीचा विचार करून या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना पत्र देऊन विनंती केली होती. त्यानुसार आजच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी केलेल्या विनंतीनुसार जेऊर येथे रेल्वे थांबा देणेबाबत उच्चस्तरावरून कार्यवाही करावी अशी शिफारस केली असून लवकरच जेऊर रेल्वे स्टेशन येथे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना निश्चितपणे थांबा मिळण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील येईल अशी माहिती रश्मी दिदी बागल यांनी यावेळी दिली. या मागणीबाबत अनेक वेळा रेल्वे प्रवाशांची आंदोलने झाली आहेत विनंती व निवेदन दिलेली आहेत. या पत्रामुळे प्रवाशांना आता या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांची सुविधा मिळणार असून प्रवाशांची कामे वेळेत व लवकर पूर्ण होतील. व त्यांच्या मागणीची लवकरच पूर्तता होईल असे शेवटी रश्मी दिदी बागल म्हणाल्या.

……………….

जेऊर मध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांनी केलेल्या मागणीप्रमाणे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा मिळण्याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी पालकमंत्र्यांना शिफारस पत्र दिले होते याबाबत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना जेऊर रेल्वे स्थानकावर या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत तातडीने पत्र दिले असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मी दिदी बागल यांच्या मागणीचा उच्च स्तरावरून विचार होऊन याबाबत लवकरच जेऊर येथे दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळेल या संदर्भात नेत्या रश्मी दिदी बागल यांनी अथक प्रयत्न केले. त्याला आज यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी येथे बोलताना दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *