
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये गोकुळाष्टमी निमित्त भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्री प्रायमरी व प्रायमरी च्या बालगोपाल कृष्ण आणि राधांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

शाळेतील शिक्षिका अश्विनी प्रशांत पाटकुलकर यांनी दहीहंडीचे महत्त्व सांगितले की, दहीहंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. दहीहंडीच्या आयोजनात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे हंडी उंचावर टांगणे आणि ती फोडण्याचा प्रयत्न करणे. ही दहीहंडी दही, लोणी व चुरमुऱ्यानी भरुन उंचावर टांगली जाते. मुले आणि मुली मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या करमणुकीचे प्रतिक आहे. जेव्हा ते आपल्या मित्रांसह उंचावर टांगलेली मडकी फोडून लोणी आणि दही चोरण्याचे प्रयत्न करायचे. या सणाला परस्पर प्रेम, सहकार्य आणि सामाजिक सुसंवाद आणि एकतेचे प्रतीक मानले जाते.
दहीहंडी फोडण्यापूर्वी बालगोपाळणी गोविंदा रे गोपाळा व चांदी के डाल पर सोने का मोर या गाण्यांवर नृत्य केले. इयत्ता पहिली च्या प्रांजल सागर लोकरे हिने राधाची वेशभूषा परिधान केली होती तर इयत्ता दुसरीचा वेदांत नितीन घोडके याने श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती. सर्व महिला शिक्षिकांनी कृष्णजन्माचा पाळणा साजरा केला. प्रि प्रायमरी विद्यार्थीनी च्या हस्ते आरती करण्यात आली. या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलांच्या बरोबरीने मुलींनी केलेले मनोरे होय. शेवटी मुलींच्या पथकाने कृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या वेदांत नितीन घोडके याने दहीहंडी फोडली. सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षिकानी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.