करमाळा प्रतिनिधी

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा

जिल्हा क्रीडा कार्यालय कुमठा नाका बॅडमिंटन हॉल या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये करमाळा तालुक्यातील खेळाडूंचे घवघवीत यश.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे 14 वर्षे वयोगट मुले ईप्पी चैतन्य गोकुळ पाटील (भारत हायस्कूल जेऊर), 14 वर्षे मुले फॉईल बालाजी रमेश वाघमोडे (भारत हायस्कूल जेऊर), सर्वेश प्रवीण जाधव (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 14 वर्षे मुले सेबर अथर्व धनंजय देवी (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), नील निलेश दोशी (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), निल विजय भांडवलकर (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 14 वर्षे मुली ईप्पी श्रुतिका नागनाथ बोळगे (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 14 वर्षे मुली फॉईल ऋतू शरद फंड (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 14 वर्षे मुली सेबर संस्कृती धन्यकुमार गारुडी (भारत हायस्कूल जेऊर), लक्ष्मी सुरज जाधव (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), शिवानी सिद्धेश्वर कुंभार (भारत हायस्कूल जेऊर), 17 वर्षे मुले फॉईल सुयश पांडुरंग चव्हाण (भारत हायस्कूल जेऊर), वरद दादासाहेब नवले (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 17 वर्षे मुले सेबर, समर्थ अविनाश करे (नवभारत इंग्लिश मीडियम करमाळा), 17 वर्षे मुली ईप्पी अभा यशवंत व्हरे (भारत हायस्कूल जेऊर), 17 वर्षे मुली सेबर कार्तिकी विनोद जाधव (भारत हायस्कूल जेऊर), 17 वर्ष मुली फॉईल मृण्मयी अजित पाटील (लीड स्कूल करमाळा), 19 वर्षे मुले फॉईल रोहित वैजिनाथ महानवर (महात्मा गांधी विद्यालय करमाळा), 19 वर्षे ईप्पी अजिंक्य लक्ष्मण दळवी (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा), 19 वर्षे सेबर मुले श्रीकांत शिवाजी वीर (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा), 19 वर्षे मुली फॉईल आदिती भीमराव सरक, 19 वर्षे मुली  ईप्पी (भारत हायस्कूल जेऊर), 19 वर्षे मुली ईप्पी समृद्धी दिनकर उघडे (भारत हायस्कूल जेऊर) या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रकाश काटुळे सर, सोलापूर जिल्हा तलवारबाजीचे संघटनेचे सचिव दीपक शिंदे सर, सर्व शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक, भीमराव सरक सर, पवन भोसले सर, अक्षय माने सर, प्रशिक्षक नागनाथ बोळगे सर व सर्व शाळेंचे क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *