माढा प्रतिनिधी

भारत देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी माढा शहरातून भव्य अशा “तिरंगा रॅलीचे” आयोजन करण्यात आले. अतिशय उत्साहात वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणांनी शहरातील वातावरण स्फूर्तीदायक बनले होते.

माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणातून निघालेल्या या सर्वपक्षीय तिरंगा रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माढा नगरीच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, माढा नगरीच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, नायब तहसीलदार विजय कवडे, नगरपंचायत विरोधी पक्ष नेते चंद्रशेखर गोटे, वडशिंगे गावचे सरपंच दत्तात्रय जाधव, शहाजी साठे, मदन मुंगळे, अनिकेत चवरे, नितीन शिंगाडे, नागेश राऊत, संध्या कुंभेजकर, आजिनाथ माळी, नितीन साठे, नितीन चवरे, धैर्यशील भांगे, नागेश खेडकर, सुरेश माळी, विठ्ठल नागटिळक, माजी सैनिक पितांबर लेंडवे, तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे छात्राध्यापक यांच्यासह शहरातील शाळा कॉलेजेस चे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माढ्यातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातामध्ये घेत देशभक्तीची ज्योत मनामनात तेवत ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.

हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण माढा शहर दणाणून सोडले. शेवटी प्रशालेमध्ये या रॅलीचा समारोप करताना दत्तात्रय जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *