करमाळा प्रतिनिधी

नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत लांब पल्ल्याची एकही बस गावात येत नाही. एक मुक्कामी बस रात्री साडे आठला येते व सकाळी सहा ला जाते. नंतर दिवसभर एकही बस नेरले गावाला नाही. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी खूप त्रास होत होता. नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या

कामासाठी शिक्षणासाठी जातात तसेच आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी कोळेगाव प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात. नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर, पुणे, मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी

येणे जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज होती. त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेरले, वरवरकुटे, बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. त्याप्रमाणे दि.26/08/2024 रोजी बस सुरू करण्यात आली. त्यामुळे नेरले गौंडरे निमगाव हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूचे विशेष आभार नागरिकांच्या वतीने मानले व निमगाव गौंडरे नेरले येथे शेकडो नागरिकांनी उत्साहात बसचे स्वागत केले. नागरिकांनी बसने प्रवास करावा अशी विनंती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *