
करमाळा प्रतिनिधी
सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या थ्रो बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये श्री राजेश्वर विद्यालय राजुरी १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दणदणीत विजय मिळवला. जिल्हास्तरीय

थ्रो बॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारा राजुरीचा संघ करमाळा तालुक्यातील पहिलाच संघ ठरला आहे. काल झालेल्या थ्रो बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगट मुले आणि १४ वर्षे वयोगट मुले या दोन्हीही थ्रो बॉलच्या संघानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यातच भर म्हणून १४ वर्षे वयोगटातील मुलींनी बार्शी (वैराग) या संघास पराभूत करून विजयाची हॅट्रिक नोंदवून प्रशालेचे नाव इतिहासाच्या पानावर नोंदवले. सदर संघास क्रीडा मार्गदर्शक मारुती संदिपान साखरे, राष्ट्रीय खेळाडू विठ्ठल सरोदे सोलापूर आणि संतोष पाटील अक्कलकोट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे प्रशालेचे संस्थापक सचिव लालासाहेब गोविंद जगताप, ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे (राजुरकर), प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सोपान झोळ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पवार व सोलापूर थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेंडे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, दादासाहेब दत्तात्रय निरगुडे, श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.