
करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अर्थात राष्ट्रीय सणादिवशी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवण्याचा व सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी ‘हिंदू-मुस्लिम एकता रॅली’ चे आयोजन करमाळा शहरात गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी केले असून या

रॅलीमध्ये लहान-थोरांसह युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभागी व्हावे असे आवाहन जगताप गटाचे यूवा नेते तसेच खरेद्री-विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी समाजमाध्यमा

द्वारे केले आहे. त्यांनी आवाहन करताना असे म्हटले आहे की, स्वांतत्र्य सैनिक देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या सोबत हिंदू व मुस्लिम बांधव एकजूटीने स्वातंत्र्य लढयात काम करत होते. तसेच मा. आ. जयवंतराव जगताप यांनी सुद्धा त्यांच्या राजकिय कारकिर्दीत आज तागायत हिंदू, मुस्लिम इ. सह सर्व जाती धर्मातील बांधवांना सोबत घेऊन राजकारण व समाजकारण करत सामाजिक सलोखा जपला असून आमची तिसरी पिढी सुद्धा हा वारसा पुढे नेत आहे. येत्या १५ ऑगष्ट रोजी शहरातील शालेय, महाविदयालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शहर व तालुक्यातील हिंदू-मुस्लिम धर्मीय युवक-युवतींसह बुजर्ग नागरिकांनी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्यदिनी ‘एकता रॅली’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘हम सब एक है’ व ‘हिंदू-मुस्लिम है भाई-भाई’ या उक्तींप्रमाणे सामाजिक सलोखा व एकजूटीचे दर्शन घडवावे व मोठ्या उत्साहाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात सहभागी व्हावे. ही रॅली दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. महात्मा गांधी विद्यालय येथून निघणार असून सदर रॅलीचा मार्ग – महात्मा गांधी विद्यालय – महाराणा प्रताप स्मारक – महात्मा गांधी स्मारक – जय महाराष्ट्र चौक – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा असेल.