करमाळा प्रतिनिधी

६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट रोजी बताम इंडोनेशिया येथे झालेल्या ५६ व्या एशियन बॉडिबिल्डींग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स २०२४ या स्पर्धेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निर्णायक भूमिका बजावली. सदर स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी

वीट गावचे लोकनियुक्त सरपंच महेश प्रभाकर गणगे यांची निवड करण्यात आली. त्यांनी २०२२, २३ मध्ये उझबेकिस्तान व थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून ते आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहतात.

आशियाई देशातील २२ देशांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये ४०० स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला. भारतीय संघाने १० सुवर्ण, १४ रौप्य व ६ कांस्य पदक मिळवून ९०५ गूणांसहित सांघिक विजेतेपद पटकावले. ज्यूनिअर बॉडिबिल्डींग मध्ये ठाण्याच्या प्रणव कोतवाल, मेन्स फिजिक्स या गटात रोहन कदम व मूंबई पोलीस निरीक्षक सूभाष पूजारी यांनी रोप्य पदक पटकावले.

मि. एशिया हा किताब मंगोलिया च्या गंझोरिग एन्ख्तुवशिन यांनी पटकावला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *