श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे मुस्लिम समाजाकडून स्वागत

करमाळा प्रतिनिधी

           श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळ्यातील औद्योगिक वसाहतीत नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी यांनी केले

            महाराष्ट्रातील काही नागरिक व्यापारासाठी मध्यप्रदेशात गेली होती व तेथेच ते स्थायिक झाले परंतु आजही ते पंढरपूर च्या आषाढी एकादशीला यायचे विसरले नाही सदरची दिंडी ही इंदौर वरुन चापडगाव येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी स्थळी येतात व तेथुन पायी चालत करमाळ्यात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या कडे त्यांचा पहिला मुक्काम असतो त्याठिकाणी तांबोळी बंधु सर्व वारकरी संप्रदायाची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे तांबोळी बंधु दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गस्थ होईपर्यंत यथासांग आदरतिथ्य करून संपूर्ण वारकरी महाराजांना पंढरपूर कडे मार्गस्थ करतात तसेच हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हाजी उस्मान शेठ तांबोळी व हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न केला यामध्ये दिवाळी असो किंवा श्री गणेश उत्सव असो ईद आदी सणांमध्ये तांबोळी बंधु चा सहभाग कायम असतो ह्याच बरोबर ते स्वतः च्या समाजाबरोबर ही इतर समाजाच्या नागरिकांचे प्रश्न हिरहिरीने सोडवतात त्यांच्या प्रभागात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती यामध्ये त्यांनी तातडीने स्वताच्या खर्चाने विंधन विहीर घेऊन दोन हजार लिटर ची टाकी बसवून पाण्याचा प्रश्न मिटवला त्याच बरोबर विहाळ येथील दफनभूमी साठी आर्थिक मदत केली तसेच कोवीड काळात केलेली मदत अद्याप पर्यंत कोणी ही विसरलेले नाहीत तांबोळी बंधु नी कोवीड काळात केलेली सेवा मदत या कामाची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेऊन हाजी उस्मान शेठ तांबोळी यांचा सन्मान केला अश्या अनेक गोष्टी ची पोच पावती म्हणून त्यांच्या प्रभागात चांगल्या मताधिक्याने निवडुन येतात याचाच एक प्रत्यय म्हणून आज त्यांच कौतुक होत आहे

          आज श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात आगमन झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पालखीचे पुजन केले यावेळी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी नगरसेवक संजय सावंत, शिवसेना शहरप्रमुख संजय शिंदे, प्रविण कटारिया, फारुक जमादार नितीन घोलप, राजेंद्र घाडगे, तौफिक शेख वाजीद शेख,मजहर नालबंद जयमहाराष्ट्र मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *