मनसेचे संजय बापू घोलप यांच्या पाठपुराव्याला यश; १५ वर्षांनंतर करमाळा–अदमापूर एसटी सेवा पुन्हा सुरू

करमाळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत अखेर तब्बल १५ वर्षांपासून बंद असलेली करमाळा–अदमापूर एसटी बस सेवा प्राथमिक स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी करमाळा डेपो व्यवस्थापक शिंदे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

मनसेच्या वतीने करमाळा–कोल्हापूर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात करमाळा–अदमापूर बस सेवा सुरू करण्यात आली असून, ही बस प्रत्येक शनिवार, पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी करमाळा डेपोतून उपलब्ध राहणार असल्याची माहिती डेपो व्यवस्थापक शिंदे यांनी दिली.

तसेच, या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून प्रवासीसंख्या वाढल्यास ही सेवा भविष्यात दररोज सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बससेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच एसटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *