
काँग्रेस आय पक्षाचा जाहीर मेळावा मा. शिंदे यांच्या उपस्थितीत – तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशील कुमार शिंदे यांची आज सोलापूर येथे सदिच्छा भेट झाली.नुतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचा करमाळा येथे करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करून लवकरच करमाळा या ठिकाणी काँग्रेस आय पक्षाचा जाहीर मेळावा खा. प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याचे काँग्रेस आय पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मा सुशील कुमार शिंदे यांना आश्वासित केले.यावेळी करमाळा तालुक्यातील विविध राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस आय पक्षाचे करमाळा शहर अध्यक्ष सुजय जगताप,कटारिया आदीजन उपस्थित होते.
