
शिक्षक विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात -प्रा.करे पाटील
प्रतिनिधी
कोर्टी: शिक्षक विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो असे प्रतिपादन हे शिकल्याने सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. गणेश करे पाटील यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी ताकरमाळा येथील विज्ञान शिक्षक 31 जुलै रोजी झाले त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळयात प्रा.करे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ .महेश अभंग, कोर्टी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण -शिंदे,पं.स.सदस्य नानासाहेब झाकणे, कोर्टी च्या सरपंच भाग्यश्री नाळे- मेहेर, उप अभियंता श्रीरंग मेहेर,उपसरपंच संतोष कुमार ( नाना) जाधव, मेजर हनुमंत जाधव, अश्विनी नाळे, शाव्यध्यक्ष बापु शिंदे, केंद्रप्रमुख वैशाली महाजन, विशाल शहाणे, आदिनाथ देवकाते,मुख्याध्यापक नानासाहेब आढाव, डॉ.तुषार नाळे,सुप्रिया नाळे,किशोर जाधवर , प्रा संजय होले, जयश्री होले शाव्यध्यक्ष कोमल नवले, नगरसेवक सुनील बनसोडे, शिक्षिका मिनल बनसोडे, सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल जगताप सावता शिंदे, महादेव कारंडे, देविदास बोटकर, निळकंठ अभंग, सुभाष अभंग,पै.दत्ता ठोंबरे, कौस्तुभ चव्हाण,चंद्रकांत क्षीरसागर , सुनील भंडारे, विजय घाडगे, कौशल्या घाडगे उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन नवले आबासाहेब कारंडे यांनी केले
या वेळी विठ्ठल जगताप, बाळासाहेब भिसे, डॉ. महेश अभंग व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त शिक्षक सुदाम नाळे यांनी उपस्थित यांचे आभार मानून ३५ वर्ष प्रमाणिक सेवा केल्यामुळे माझा मुलगा डॉक्टर ,सून व्याख्याती झाली आहे .१६ विद्यार्थी उच्च पदावरती आहे असे सांगितले व आपले आदर्श आपली आई व�
