करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली असुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत अधिक माहिती अशी की. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस असल्याने माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी थेट अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन प्रत्यक्ष विजयदादांची भेट घेतली. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले. माजी आमदार नारायण पाटील हे

विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षं नारायण आबा पाटील यांनी मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानून आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली. याबाबत अनेकदा आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी बोलून दाखवले की, राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा मितभाषी स्वभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक व राजकीय वाटचाल चालू ठेवण्याची पध्दत आपल्याला प्रभावित करते. विजयदादा हे स्वभावाने शांत आणि

मितभाषी असले तरी प्रशासनावर त्यांची घट्ट पकड होती. कृष्णा भीमा स्थिरीकरण, सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली हजारो कोटींची विकासकामे, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, दुध संघ, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, विधानसभा आणि विधान परिषद निवडणुका आदि बाबत विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द महत्वाचा ठरला. स्व. सुधाकरपंत परिचारक, स्व‌. गणपतराव देशमुख यांच्या सारख्या जेष्ठांचा सन्मान ठेऊन त्यांनी सोलापूर जिल्हयाची धूरा यशस्वीपणे सांभाळली. यामुळे माझ्या सारख्या नवख्या कार्यकर्त्यांसाठी विजयदादा हे आदर्श आहेत. करमाळा मतदार संघातील आदिनाथ कारखाना आणि इतर संस्थासाठी त्यांनी मोलाचे योगदान आणि मदत केली असून अनेक विकासकामात त्यांनी हातभार लावला असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *