पुर्व भागाचा कायापालट होण्यासाठी उजनीतील पाण्यावर करमाळा तालूक्याने अधिकारवाणीने आपली बाजू मांडण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी व्यक्त केले. निंभोरे ता.करमाळा येथील सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्या जनसंवाद गावभेट दौऱ्यास आज सुरुवात केली. यावेळी निंभोरे येथे गावकऱ्यांनी पाटील यांचे जंगी स्वागत केले. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विजयी उमेदवार तथा नुतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातुन तब्बल ४१ हजार हुन अधिक मताधिक्य दिल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांचा निंभोरे ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी अधिक बोलताना पाटील म्हणाले की दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पुर्व भागास चांगले दिवस येणार आहेत. सन २०१४ मध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली म्हणुनच वीस वर्षे रखडलेली ही योजना आपण पुर्ण करु शकलो. आगामी काळात उजनीच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ करमाळा तालूक्याला मिळावा म्हणून आपण पुर्ण राजकीय ताकद पणाला लावून लढणार असल्याची खात्री यावेळी त्यांनी बोलून दाखवली.निंभोरे हे करमाळा तालुक्यातील पुर्व भागाचे द्वार असल्याने या ठिकाणी उजनीच्या पाण्याचा विषय काढल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत सिंचन या विषयावर माजी आमदार नारायण पाटील हे अधिक जोर लावणार असल्याचे संकेत पहिल्याच सभेतून मिळाले. पुर्व भागासाठी शेतीसाठी पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन नाना जगताप यांनी केले. यावेळी सभापती अतुल पाटील, उप सभापती दत्तात्रय सरडे, प्रा.अर्जूनराव सरक, भारत सांगडे, जवाहर लुणावत, पंडीत वळेकर, नितीन लांडगे, अविनाश वाघमारे, दिनेश वाघमारे, भारत अडसुळ, कांबळे सर, पंजाब गाडे, राज पठाण, भीमराव मारकड, बाळासाहेब वळेकर, सतीश जाधव, भानुदास जाधव, सचीन वळेकर, भालचंद्र वळेकर, गणेश वळेकर, भाऊ वाघमारे, कैलास काकडे, बिभीषण फरतडे, सुभाष फडतरे, राजेंद्र वळेकर
आदि उपस्थित होते.