करमाळा शहर व तालुक्यामध्ये बकरी ईद ची नमाज उद्या आठ वाजता होणार,,,,, हाजी उस्मान शेठ तांबोळी
**
करमाळा,**तालुका प्रतिनिधी मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण अर्थात बकरी ईद तारीख 17 जून सोमवार रोजी उत्साहात साजरी होत असून सदरची नमाज करमाळा शहर व तालुक्यामध्ये सकाळी आठ वाजता अदा केली जाणार असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे अध्यक्ष व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी पत्रकारांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तांबोळी यांनी सांगितले की उद्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र बकरी ईदचा सण असून सदरचा सण हा करमाळा शहरातील मुस्लिम बांधव प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शांततेच्या वातावरणात साजरा करणार आहे. याशिवाय बकरी ईद ची नमाज उद्या सकाळी करमाळा शहरातील मक्का मशिद म्हणजे मरकज, जामा मशीद, नुरानी मशीद, आराफात मशीद, दर्गा मस्जिद, आयेशा मशीद, मा आयेशा मशीद तसेच करमाळा तालुक्यातील केम, कंदर, उमरड, आवाटी, पारेवाडी, पांडे, हिसरे, रावगाव, सालसे, साडे, सावडी, कुंभारगाव, कोर्टी, कुगाव, जेऊर आदि ठिकाणी नमाज होणार आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत तसेच शासनाच्या नियमाचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करीत बकरी ईद साजरी करावी असे आवाहन मुस्लिम समाजाचे युवा नेते माजी नगरसेवक तसेच मक्का मशिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांनी केले आहे.