आचारसंहिता संपली…
आता मंजूर कामे तात्काळ सुरू करा …
आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना.
प्रतिनिधी
करमाळा तालुक्यासाठी रस्ते, पाणी, वीज ,आरोग्य व शिक्षण या सर्वच मूलभूत गरजांना डोळ्यापुढे ठेवून आमदार संजयमामा शिंदे यांनी गत 4 वर्षात 2000 कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यापैकी अनेक कामे टेंडर प्रोसेसला आहेत .सदर कामांची पुढची प्रोसेस लोकसभेच्या आचारसंहितेमुळे थांबली होती आता आचारसंहिता संपली असून मंजूर कामे तात्काळ सुरू करा तसेच ज्या कामांना निधी मंजूर आहे परंतु त्यांची इस्टिमेट अद्याप बाकी आहेत ती पूर्ण करून ती कामे ही तात्काळ पूर्ण करा अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच पाटबंधारे विभाग यांना दिलेल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये असताना अर्थसंकल्पामध्ये निधी मिळालेल्या कामापैकी अनेक कामांना स्थगिती दिली होती त्यापैकी सर्वच कामांची स्थगिती महायुतीचे सरकार आल्यानंतर ना. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून उठलेली आहे. त्यापैकी डिकसळ पुलाचे काम सुरू आहे परंतु प्रमुख जिल्हा मार्ग असलेले रस्ते अनेक रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
ही कामे तात्काळ सुरू होणार –
- बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे निंभोरे लव्हे जेऊर रस्ता प्रजिमा क्र.6 – 2 कोटी 85 लाख.
- मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटणे कोंढेज रस्ता प्रजिमा क्रमांक 8 – 1 कोटी 90 लाख.
- कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर 2 ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा -124 – 2 कोटी 85 लाख.
- पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज निंभोरे मलवडी दहिवली कन्हेरगाव ते वेणेगाव प्रजिमा 4 –
3 कोटी 32 लाख.
अर्थसंकल्पातील स्थगिती मिळालेल्या या कामांबरोबरच नव्याने डिसेंबर व जुलै च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली कामे ,25 15 ची कामे ,3054,5054 हेड ची कामे,समाज कल्याण विभागाची कामे, जन सुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र, दलित वस्ती ,जलसंधारण विभागाची कामे, दहिगाव योजनेची सुरू असलेली कामे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे सुरू असलेले इमारत बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासंबंधी आमदार शिंदे यांनी सर्व विभागांना सूचित केलेले आहे.
लवकरच या सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवल्या जातील व विकास कामे वेगाने पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहील अशी माहिती त्यांनी दिली आहे.