करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळा हिंगणी शाळेस लोकनेते स्व.दिगंबरराव बागल प्राथ.शिक्षक सह.पतसंस्था करमाळा यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा हिंगणी आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परीषद शाळा हिंगणी स्वच्छ सुंदर शाळा, A I चाचणी मध्ये सुपर निपुण शाळेची गुणवत्ता, रंगरंगोटी, शालेय भौतिक सुविधा, संगणक प्रयोग शाळा, सुसज्य मुख्याध्यापक कार्यालय, लोक सहभागा मध्ये उल्लेखणीय कार्य  यासर्व निकषांच्या आधारे निवड करून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शाळेस आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन, सचीव व सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद बांधव उपस्थित होते. गटशिक्षणाधीकारी रिंकल हाडके, केंद्रप्रमुख विकास काळे, शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *