करगाळा प्रतिनिधी

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २९/०/२०२६ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता भिलारवाडी येथील कारखाना कार्यस्थळावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

तत्पूर्वी कारखान्याचे संस्थापक, लोकनेते स्व. दिगंबरराव बागल (मामा) यांचे कारखाना कार्यस्थळावर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन शेटफळ गांवचे प्रगतीशिल बागायतदार लालासाहेब पोळ यांचे हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तदनंतर सभेच्या कामकाजास सुरूवात होवून सुरूवातीला कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करून सर्व विषयास मंजुरी देणेबाबत सभेस उपस्थित असलेल्या सभासदांना विनंती केल्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासद यांनी एकमुखाने मंजुरी दिली. विषयपत्रीकेवरील सर्व विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर कारखान्याचे संचालक कल्याण सरडे यांनी कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांची मुख्यमंत्री पाणंद रस्ते सहअध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेणेबाबत विनंती केली तसेच मौजे सावडी ता. करमाळा येथील सभासद संतोष तळेकर यांनी तालुक्यातील दुष्काळी परीस्थीतीचा विचार करून कारखान्याचे वतीने एक चारा छावणी सुरू करावी अशी विनंती केली.

आपल्या प्रास्ताविकामध्ये कारखान्याच्या मार्गदर्शिका रश्मी (दिदी) बागल यांनी राज्यातील सर्वच साखर कारखाने मागील चार पाच वर्षापासून फार मोठ्या संकटातून जात असून येत्या पुढील काळात मकाई कारखाना हा नावारूपास आलेला सहकारी तत्वावरील कारखाना असेल असे सांगीतले. सध्या महाराष्ट्रावर फार मोठ्या दुष्काळाचे सावट असुन शासनाच्या आदेशानुसार कारखान्याचे वतीने जनावरासाठी छावणी सूरू करण्याच्या तसेच या वर्षात कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना येत्या दिपावली सणासाठी ८.३३ टक्के बोनस अदा करण्याच्या सुचना संचालक मंडळास दिल्या. तालुक्यातील उजनी पाणी वाटप नियोजन कमिटीमध्ये उजनी परिसरातील व्यक्तींचा समावेश करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन यांनी तालुक्याच्या मा. आमदार शामलताई दिगंबरराव बागल, कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल व आपल्या मार्गदर्शिका रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पुढील काळात कारखाना खुप प्रगती करेल अशी ग्वाही देवून रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे या वर्षात कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना येत्या दिपावली सणासाठी ८.३३ टक्के बोनस आदा केला जाईल असे सांगीतले. शेवटी आभार संचालक कल्याण सरडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *