करमाळा प्रतिनिधी

मांगी तलावाचे राखीव पाण्याचे कारण देत 8 तासांची सुरळीत असलेली वीज कपात करून एक दिवसाआड दोनच तास वीजपुरवठा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी ए.कार्तिकेन यांनी परिपत्रक काढून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतात आलेली पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.

भाजप सरकार देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी, महावितरणच्या चूकीच्या निषेधार्थ वडगाव येथील शेतकरी संदीप काळे व विकास गायकवाड यांची काल पासून करमाळा तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी वडगाव(द), वडगाव (उ), मांगी, पूनवर, वंजारवाडी, जातेगाव, रायगाव, राखवाडी, हिवरवाडी,भोसे आदी गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थिती होती.

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण गेली दोन दिवसांपासून सुरू आहे. उपोषणाचा आजचा दिवस दूसरा आहे. या आंदोलनास शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार शिल्पा ठोकडे मॅडम, एम.एस.सीबीचे अधिकारी कुरडे, लोकरे, झूंजकर व बागल गटाचे नेते दिग्विजय भैय्या बागल, पंचायत समितीचे माजी सदस्य अँड. राहुल सावंत, अँड. विशाल घोलप, सुजित तात्या बागल, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, राष्ट्रवादीचे संतोष वारे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप, सरपंच संदीप शेळके, गोवर्धन करगळ, दिलीप भुजबळ, अजिनाथ सुरवसे, विजयकुमार सोलनकर,काका गायकवाड सह पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय शिष्टमंडळांच्या समवेत उपोषणकर्ते काळे व गायकवाड यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ही बैठक निष्फळ ठरली. मांगी तलावाचे राखीव पाण्याचे कारण देत दोनच तास वीजपुरवठा शासनाच्या परिपत्रकानुसार देणार असल्याचे सुतोवाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आठ तास वीजपुरवठा ऐवजी चार तास तरी विजपुरवठा देण्यांचा मार्ग भाजप नेते दिग्विजय बागल, तहसीलदार शिल्पा ठोकडे, एम.एस.सीबी अधिकारी यांच्या समवेत काढला परंतु जिल्हाधिकारी, पालकमंत्री व कार्यकारी अभियंता राकेश मगर यांच्याशी दिग्विजय बागल यांनी फोनद्वारे संवाद साधला असता यावर कोणताही तोडगा आणि लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषण कर्त्याचे आमरण उपोषण करमाळा तहसील येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरूच आहे.

दूष्काळ जन्य परिस्थिती असल्याने कारण देत मांगी तलावातील पाणी पिण्याच्या नावाखाली राखीव ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यास शेतकऱ्यांचा कोसलाही विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या विहिरी किंवा बोअरवेल, शेततळे आहेत, त्यांचा वीज पुरवठा दोन तास ऐवजी चार तास तरी चालू ठेवावा अशी आग्रही मागणी यावेळी उपोषणकर्त्य काळे व गायकवाड व आणि ग्रामस्थांनी केली आहे. महावितरणच्या वीज कपातीमुळे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, केळी, मका, कांदा, तूर आणि जणांवरांसाठी शेतातील चराऊ पिके पाण्याअभावी लाईट कपातीमुळे करपू जळू लागलेली आहेत. पिण्यांचे पाणी, जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी लाईट नसल्याने पुरेसे मिळत नाही. “महावितरणच्या अशा धोरणामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शेतकरी बांधव करत आहे.शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास‌ शासनच्या जुलमी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला जाऊन कर्जबाजारी होत चालला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्याचे धोरण भाजप फडणवीस सरकारचे आहे की काय असा सवाल रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *