
करमाळा प्रतिनिधी
मित्रांनो अखेर आज आपल्या सर्वांचे लढयाला यश आले आहे. हा आपल्या सर्वांचे एकजुटीचा विजय आहे. केत्तुर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांचे वतीने मी प्रथमतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शतशः आभार व्यक्त करतो.

खरं तर आपण आजपर्यंतची प्रत्येक गोष्ट संघर्ष करूनच मिळवली आहे. मग तो केत्तुर, पोमलवाडी चे पुल असु दया किंवा राष्ट्रीयकृत स्टेट बँक असु दया. आज आपल्या स्टेशनला एका गाडीला जरी हॉल्ट मिळाला असला तरी आगामी कालावधीत

अजुनही गाडया थांबतील याचा विश्वास आहेच. खासदार रणजितदादा निंबाळकर यांनी आपणा सर्वांना ठोस पणाने दिलेले आश्वासन पाळले आहे. त्यांचेसह या कामी सहकार्य करणारे त्यांचे स्वीय सहाय्यक शिंदे व मोहीते या दोघांचेही विशेष आभार.

तसेच करमाळा भाजपाचे पदाधिकारी गणेशजी चिवटे, ॲड. प्रियल आगरवाल, नरेंद्रसिंह ठाकुर, श्याम सिंधी, दिनेश मडके यांचेही आम्ही आभारी आहोत. आपले मागणी करीता सहकार्य करणारे व प्रत्येक वेळी अर्जाची टाइपिंग करून देणारे सचिन

खराडे, संतोष राऊत यांचेही आभारी आहोत. या लढयात हिरीरीने भाग घेणारे सर्व ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ – व्यापारी – महीला मंडळ, युवा बांधव, नेताजी सुभाष विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, यांचेही विशेष आभार. वेळोवेळी प्रत्येक मिटींगला

हजर राहणारे व ठराव देणारे सरपंच पोपटराव माळशिकारे ( गोयेगाव), अविनाश मोरे (खातगाव), सुनील ढवळे (देलवडी), पांडुरंग नवले (पारेवाडी), दादासाहेब कोकर (रिटेवाडी), नवनाथ गायकवाड, संग्राम पाटी (पोमलवाडी), संतोष बाबर, हनुमंत

पाटील (हिंगणी), माउली भागडे, सुनील तानवडे, साधु तानवडे, सुरेश माने, विलास खुळे, पांडु गुंजाळ व इतर (भगतवाडी- गुलमरवाडी), तानाजी बापु झोळ (वाशिंबे), राजाभाऊ भोसले (राजुरी) तसेच सचिन वेळेकर (केत्तुर) यांचे देखील शतशः धन्यवाद. तसेच सर्व ग्रामस्थ, व्यापारी यांचेही शतशः आभार मानले पाहिजेत. आपल्या गावातील युवा शक्ती, महीला मंडळ यांचेही आभार. या कामी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे सर्व पत्रकार बंधुचे देखिल शतशः आभार. तसेच नेताजी सुभाष विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचेही विशेष आभारी आहोत. एल्गार मोर्चासाठी व आजपर्यंत च्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले आहेत.