
करमाळा प्रतिनिधी
आपण जर शरीराच्या सर्व कर्करोगाचे प्रमाण बघितले तर तोंडातील कर्करोगाचे किंवा कॅन्सर चे प्रमाण हे जवळ जवळ 12 ते 15 %एवढे आहे. याचे प्रमाण हे दिवसेन दिवस वाढत असून हि एक चिंतेची बाब आहे. प्रामुख्याने तोंडातील कर्करोग किंवा कॅन्सर हा काही ना काही व्यसनांमुळे होतो. त्यामध्ये प्रामुख्याने तंबाखू , गुटखा , सिगारेट ,दारू , सुपारी यांच्या अतिसेवनामुळे होतो. काही प्रमाणात हा आजार खराब दात , टोचणारे तुटलेले दात ,हिरड्यातून रक्त व पु बऱ्याच काळापासून येणे व त्याकडे दुर्लक्ष्य करणे तसेच किडलेले दात व त्यामुळे होणाऱ्या हाडातील गाठी किंवा त्यापासून होणारे हिरड्याचें आजार यामुळेही तोंडातील कर्करोग होऊ शकतो.

तोंडातील कर्करोगामध्ये हिरडीचा ,गालाचा, जिभेचा, टाळ्याचा कर्करोगाचे प्रमाण खूपच आहे. आजपर्यंत माझ्या 23 वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये तोंडातील कर्करोगाचे हजारो रुग्ण मी पाहिलेले आहेत.
असाच एक रुग्ण मला आठवतो आहे त्यास तंबाखूमुळे त्याच्या गालातील आतील बाजूस कि जिथे तो तंबाखू ठेवत होता त्याठिकाणी एक पांढरा डाग किंवा पॅच होता , त्यावेळी मी त्यांना सांगितले कि, तंबाखू बंद करा जेणेकरून तो डाग वाढणार

नाही व त्याचे कर्करोगामध्ये रूपांतर होणार नाही. कारण पांढरा डाग किंवा पॅच दिसणे हि कर्करोगाची सुरवात असते , या स्टेज ला पेशंट ने व्यसन बंद केले तर तो डाग किंवा चट्टा नॉर्मल होऊ शकतो. पण जर व्यसन चालू ठेवले तर शरीर एक नवीन प्रकारच्या पेशी तयार करते कि ज्याला आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो .याही पेशंट ला मी सर्व समजावून सांगितले होते पण त्यांनी ऐकले नाही ,जेव्हा तो पेशंट सहा महिन्यांनी परत माझ्याकडे दात हालत आहे आणि काढून टाका यासाठी आला

तेव्हा पहिले तर त्याला त्याच ठिकाणी मोठी गाठ दिसून आली कि जी पूर्णपणे पसरलेली होती .जेव्हा मी पेशंट ला स्कॅन करून दाखवले त्यावेळी त्याने सांगितले कि डॉक्टर तुम्ही मला सहा महिन्यांपूर्वी तंबाखू बंद करण्यास सांगितले होते पण मी ऐकले नाही आणि तो अक्षरशः रडू लागला , कारण कॅन्सर म्हटले कि प्रचंड वेदना , त्रास आणि मरण असेच विचार रुग्णास येतात. जेव्हा त्या गाठीचा तुकडा काढून तपासाला तर त्यामध्ये कॅन्सर च्या पेशी आढळल्या व जो कर्करोगासाठी उपचार असतो म्हणजे ऑपरेशन , केमोथेरपि , रेडिओथेरपि या सर्वां मधून रुग्णास जावे लागते .

एकंदर हे सर्व उपचार घेत असताना प्रचंड वेदना , मानसिक व शारीरिक त्रास , घरच्यांना व नातेवाईकांना त्रास व खर्च होत असतो .
एक मुख रोग किंवा तोंडाचा तज्ज्ञ म्हणून जेव्हा रोज पेशंट पाहत असतो त्यावेळी असे लक्षात येत आहे कि, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे , कर्करोगाचे जास्त पेशंट पाहायला मिळत आहेत आणि अगदी कमी वयातही पेशंट पाहायला मिळत आहेत .हि नक्कीच खूपच गंभीर बाब आहे .

एक मध्यम वयाच्या मावशी होत्या , त्यांच्या आईला कॅन्सर होता , तिच्या आईची सर्व जबाबदारी या मावशीवर होती , वर्षभरापासून या मावशीला तोंडात गाठ होती पण आईच्या कॅन्सर च्या आजारपणामुळं तिला एक वर्षांपासून स्वतःला त्रास

असूनही दवाखान्यात येता आले नाही , वर्षानंतर जेव्हा तिची आई देवा घरी गेली तेव्हा ती दवाखान्यात आली , तपासल्यानंतर असे लक्षात आले कि हि कॅन्सर ची गाठ आहे , तुकडा काढून तपासले असता ती कॅन्सर ची गाठ निघाली , म्हणजे तिच्या आई कॅन्सर ने गेली आणि हिला स्वतःला पण कॅन्सर झाला , आईला वाचवायला गेली आणि स्वतःलाही तोच आजार झाला , हे सर्व बघून व ऐकून डोळ्यात अक्षरशः पाणी आले . म्हणजे आजही आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष्य करतो याचे हे उदाहरण आहे. हेच जर आपण सुवातीच्या स्टेज मध्ये किंवा लवकर दवाखान्यात दाखवले व योग्य ते उपचार घेतले तर जीव वाचण्याची शक्यता खूप वाढते .
या साठी डॉक्टरांबरोबरच सामाजिक संस्था किंवा जे कोणी कॅन्सर साठी काम करतायेत यांनी प्रबोधन करणे गरजेचे आहे. यामध्ये मुख्यत्वे तोंडाचे डॉक्टर्स किंवा दंतरोग तज्ज्ञ याना सामावून घेतले पाहिजे . मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी वेळोवेळी झाली पाहिजे , व्यसनांवर प्रभोदन झाले पाहिजे , सरकारच्या माध्यमातून शाशन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे .

जेव्हा घरात एखादा तोंडाचा कॅन्सर चा रुग्ण असतो किंवा कुठल्याही कॅन्सर चा रुग्ण असतो तेव्हा ते संपूर्ण कुटुंब खूप साऱ्या मानसिक तणावातून जात असते . तोंडाच्या कॅन्सर च्या पेशंट चा विचार केला तर जबड्याचा काही भाग , कधी कधी संपूर्ण जबडा काढलेला असतो , त्यामुळे चेहरा विद्रुप होतो , अस्या रुग्णास नीट खाता येत नाही , नीट बोलता येत नाही , समाजात वेगळ्या नजरेतून बघितले जाते आणि काही वेळा काही रुग्णास पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हा आजार होतो त्यावेळी मात्र तो रुग्ण पूर्ण खचून जातो , परत ऑपेरेशन व सर्व उपचार घ्यावा लागतो , प्रचंड वेदना असतात , घरातले वैतागलेले असतात , तो रुग्ण नकोसा होतो आणि काही दिवसांनी तो रुग्ण दगावतो .
आम्ही पूर्ण बरे झालेले रुग्ण पण बघितले आहेत कि जे वेळीच दवाखान्यात आले , लवकर निदान व उपचार झाले . असे रुग्ण आवर्जून येऊन धन्यवाद देतात , पाया पडतात आणि सांगतात कि डॉक्टर तुम्ही लवकर निदान केले व माझा जीव वाचला. त्यावेळी कुठेतरी आपण समाजासाठी थोडेफार का होईना काम करत आहोत याचे समाधान लाभते. आम्ही आमच्या 23 वर्ष्यांच्या प्रॅक्टिस मध्ये हजारो रुग्णांचे वेळीच निदान केले आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे , त्यांचे प्राण वाचवले आहेत .
नुकताच आमच्या सारंगकर डेंटल क्लिनिक मध्ये आम्ही जबड्याचा C T स्कॅन व इंट्रा ओरल स्कॅन ची सुविधा उपलब्ध केली आहे , जेणेकरून लवकर निदान व्हावे व तातडीने रुग्णास उपचार मिळावेत हा एक मेव हेतू आहे .
तोंडातील कर्करोग किंवा कॅन्सर टाळण्यासाठी आपण कुठलेच व्यसन नाही केले पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे. आपले मौखिक आरोग्य व्यवस्तीत ठेवले पाहिजे ,किमान सहा महिन्यातून एकदा आपल्या तोंडाची तपासणी करून घेतली पाहिजे , खराब ,किडलेले किंवा तुटलेले दातांचा वेळीच उपचार केला पाहिजे ,दात टोकरने किंवा तुटलेले टोचणारे दात तोंडात ठेवणे टाळले पाहिजे .
हिरड्यातून रक्त पु येत असेल तर त्याचा वेळीच उपचार घेतला पाहिजे.
एकंदर या सर्व गोष्टी आपण आचरणात आणल्या तर निश्चितच आपण कॅन्सर सारख्या आजाराला लांब ठेवू शकतो व आपले आयुष्य वाढवू शकतो .
धन्यवाद डॉ चंद्रकांत सारंगकर दंत रोग तज्ज्ञ सारंगकर डेंटल क्लिनिक कॉटेज हॉस्पिटल समोर ,करमाळा. Mo -9423333904