
करमाळा प्रतिनिधी
इरा पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिध्द उद्योगपती सतिश शेठ सुराणा, सरपंच धनश्री विकास गलांडे, राजाभाऊ बारकुंड (मा.उपाध्यक्ष जिल्हा

परिषद सोलापूर), चंद्रकांत (काका) सरडे (मा. सरपंच), दत्तात्रय सरडे मा.उपसभापती करमाळा, महादेव पोरे सरपंच कुगाव, पांडुरंग लबडे सरपंच शेटफळ, नितीन भोगे (अध्यक्ष गुरुकुल पब्लिक स्कूल करमाळा), महेंद्र वाकसे (इरा पब्लिक स्कूल टेंभुर्णी), सचिन पवार, राजेश शुक्ल,गजेंद्र पोळ सकाळ वार्ताहर ,प्रशांत नाईकनवरे पुढारी वार्ताहर, मिलिंद डहाके (अध्यक्ष इरा

पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, नागपूर), राजकुमार राऊत (अध्यक्ष बबनराव शिंदे स्कूल कंदर)व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनासाठी चिखलठाण व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी अफाट गर्दी केली होती.

इरा च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
श्री. छत्रपती शिवाजमहाराजांच्या राज्याभिषेक सादरीकरणाने तर आसमंत उजळून निघाला. रामायण व चंद्रयान या नृत्यांनी तर अदभुत वाहवा मिळविली.
या कार्यक्रमाचे वैशिष्टे म्हणजे सूत्रसंचालन हे इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने सादर केले.

सर्व गाणी सादरीकरण होईपर्यंत प्रेक्षकांनी आपली जागा सोडली नाही. असा भव्यदिव्य कार्यक्रम पाहून सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
असा मनमोहक व नयनरम्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ड्राइवर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.
