
करमाळा प्रतिनिधी
काल रात्री उमरड येथील उजनीधरण काठावर उमरड चरीवरील तब्बल सहा विद्युत मोटारींची वायर चोरट्यांनी चोरी केली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात सुनील बदे, मनोहर

बदे, दत्ता बदे, महादेव मिसाळ, सुरेश कोठावळे, तानाजी कोठावळे या शेतकऱ्यांची चोरी झाली आहे. धरणाच्या फुगवटयावर असलेल्या उमरडच्या शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पाणी मिळवावे लागते. पीके वाचवण्यासाठी दोन तीन मोटार व पाईपलाईन

करून शेत बागायत करावे लागते. मात्र काल रात्री चोरी झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत कारण धरण काठावर शेतकऱ्यांचा निम्मा प्रपंच उघड्यावर पडलेला असतो. या दुष्काळी परीस्थितीत पिके वाचवणे हे आव्हान असताना चोरीचे

प्रकार घडत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.


