करमाळा प्रतिनिधी
नगरपरिषद शिक्षण मंडळ करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवात करमाळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी नी मोठया प्रमाणावर
सहभाग घेतला होता. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा व यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी. या हेतूने हा क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. यात आयोजित स्पर्धेत नगर परिषद मुला मुलींची शाळा नंबर चार च्या
विद्यार्थिनी श्रावणी पांडुरंग शिंदे हिने सर्व शाळांमधे धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाने तिचे कौतुक करत शाळेतील शिक्षकांनी आनंद व्यक्त केला व तिचे क्रीडा महोत्सवात असलेला उत्साह बघून तिला भविष्यात क्रीडा
क्षेत्रात तिची अपेक्षा असेल तर तिला भविष्यात सपोर्ट करू असे श्रावणी चे पालक पांडुरंग शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.