करमाळा प्रतिनिधी
ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत करमाळा तालुक्यातील सावडी येथील पै. उदय सतीश शेळके यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद मान्यतेने पहिले कुमार व 26 वी वरिष्ठ ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिनांक 20-21-22 फेब्रुवारी रोजी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन कात्रज पुणे येथे झाले होते. याचे आयोजन स्व.पै. संदीपभाऊ
मोहोळ फाउंडेशन ट्रस्ट शिवभक्त प्रतिष्ठान, वारजे पुणे यांनी केले होते. या स्पर्धेत 97 किलो गटात उदय शेळके यांनी प्रतिस्पर्धी यास एक ही गुण न देता सुवर्ण पदक पटकाविले आहे. याला इलेक्ट्रिक स्कूटी बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली
आहे. शेळके यास अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आमदार संजयमामा शिंदे, तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व कुस्तीगारांनी उदय शेळके यांचे अभिनंदन केले आहे.