जेऊर करमाळा

रजत पदक विजेता राष्ट्रीय खेळाडू राज वाघमोडे याचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या 34 व्या राष्ट्रीय कनोईन व कायनिंग आणि 12 व्या ड्रगन स्पोर्ट स्पर्धेमध्ये  राज भागवत

वाघमोडे याने भारतामध्ये दुसरा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल मा. आ. नारायण पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राज यांच्या या यशाचे कौतुक करताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातून

जाऊन देशपातळीवर यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी जिद्द चिकाटी आणि परिश्रम लागतात आणि हे गुण राज वाघमोडे यांच्या मध्ये आहेत. यामुळेच कनोईन व कायनिंग यासारख्या खेळा मध्ये अथक सराव करून राज वाघमोडे याने

आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. आगामी काळात राज याने भारताचे प्रतिनिधित्व करून या खेळात जागतिक पातळीवर यश मिळवावे अशी अपेक्षा माजी आमदार तथा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते कुस्तीगीर नारायण पाटील यांनी व्यक्त

केली. यावेळी किरण बोरकर, नवनाथ वाघमोडे, पपू खरात, शहाजी खरात, दीपक सलगर, भैया वाघमोडे, भारत खरात, काका बोरकर, जीवन खरात, हेमंत गोफने, दत्तात्रय खरात, हिराजी चौगुले, किरण पाटील, शिवाजी खरात, आप्पा चौगुले, सुनील सांगवे, भारत सलगर, कुंडलिक गडदे, देविदास पाटील, काका पाटील आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *