
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र करमाळा भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आले.

बाळासाहेब होसिंग हे याआधी भाजपा उद्योग आघाडीचे करमाळा तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाचे काम जोमाने केले होते. या कामाची दखल घेत आज त्यांना सोलापूर जिल्हा व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी

देण्यात आली आहे. या निवडीनंतर व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होसिंग म्हणाले की, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आपण व्यापार आघाडीच्या मार्फत आपण व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न

करणार आहे. या निवडीवेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, भाजपा जि.उपाध्यक्ष अजिनाथ सुरवसे, भैय्या कुंभार, संजय किरवे, महादेव गोसावी, गणेश गोसावी यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते.


