करमाळा प्रतिनिधी

भिवंडी येथील दलित तरुण हत्याकांडाप्रकरणी शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख कैलास धोत्रे याच्यावर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी करमाळा पोलीस स्टेशन यांना यशपाल कांबळे यांचे निवेदन

  निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी भिवंडी शहरातील बी एन एम कॉलेज जवळ देवा धोत्रे यानी

संकेतला मुद्दाम धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व हाण मार देखील केली. देवा धोत्रेने त्याचा वडील कैलास धोत्रे ( शिवसेना (शिंदे गट ) उपशहर प्रमुख ) याला कॉल करून बोलवून घेतले. त्यानंतर कैलास धोत्रे व त्याच्या साथीदारानी संकेतचे अपहरण केले व त्याला अमली पदार्थ पाजून पाईपने बेदम मारहाण केली. त्यात संकेत भोसले बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर त्याने

पाणी मागितले तर कैलास धोत्रे व त्याच्या साथीदारानी आणि त्याच्या तोंडात लघवी केली व पुन्हा बेदम मारहाण सुरू केली. त्यात संकेत बेशुद्ध पडला आरोपींनी संकेतला एका अज्ञात स्थळी फेकून देऊन पळ काढला.

            दलित तरुण संकेत भोसलेचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण तेथील

पोलिसांनी ही घटना आमच्या परिसरात घडलेली नाही असे सांगून टाळाटाळ केली. तरी सदरील पोलिसाची चौकशी करून त्या पोलिसावरही गुन्हा दाखल करावा.

       कुटुंबियांनी तब्बल अडीच तास शोध घेतल्यानंतर तो सापडला. संकेत त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत होता संकेतला के ई एम रुग्णालय मुंबई येथे दाखल केले उपचारादरम्यान बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी दलित युवक संकेत भोसले याचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.

       पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या  घटना सतत घडत आहेत असे आणखीन किती बळी हे प्रशासन घेणार आहे. सत्तेचा माज असणाऱ्या कैलास धोत्रे व त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून दलित युवक संकेत भोसले यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा ही देण्यात आला. यावेळी प्रसेंजित कांबळे, रणजीत कांबळे विजय कांबळे आदि जन उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *