करमाळा प्रतिनिधी

आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने निवेदन माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती ॲड. राहुल सावंत ( सदस्य, जिल्हा नियोजन समिती सोलापूर व अध्यक्ष, हमाल पंचायत करमाळा )  यांनी दिली आहे.

          सोलापूर जिल्ह्यातील  विविध हमाल, तोलार, कामगार संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 2024 रोजी राज्याचे कामगार नेते डॉ. बाबा आढाव,  नरेंद्र पाटील व इतर कामगार संघटनेचे नेते मुंबई येथील आझाद मैदानावर माथाडी कायदा वाचवण्यासाठी व  माथाडी कायदा सुधारण्याच्या नावाने आणलेले विधेयक हे माथाडी कामगार विरोधी

असल्याकारणाने ते तात्काळ रद्द करण्याबाबत व कामगारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण व आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील हमाल, तोलार एक दिवस कामकाज बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सोलापूर जिल्ह्यातील समवेत करमाळा येथील हमाल, तोलार, कामगार  जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजता भव्य मोर्चा काढून आंदोलन करून जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात

येणार आहे. या  मोर्चाची सुरुवात सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता मार्गाने मोर्चा  काढत आहे. या मोर्चामध्ये करमाळा तालुका हमाल पंचायत येथील हमाल, तोलार एक दिवसीय कामकाज बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी होत आहे.

         या आंदोलनाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, आमदार संजय मामा शिंदे करमाळा, जिल्हाधिकारी सोलापूर, चेअरमन, सोलापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ व कामगार आयुक्त सोलापूर, जिल्हा सहाय्यक निबंधक सोलापूर, तहसीलदार  करमाळा, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा,  सभापती/ सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा यांना देण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *