करमाळा प्रतिनिधी

करमाळा- श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या तीन महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून

आज शनिवार दिनांक २४.०२.२०२४.रोजी कै.पोपटराव माणिकराव अनभुले यांच्या स्मरणार्थ सतीश पोपटराव अनभुले रा.श्रीदेवीचामाळ रु.२३४५|-(दोन हजार तीनशे पंचेचाळीस रु. फक्त) यांनी श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास ऑनलाइन देणगी यांच्या कडून प्राप्त झाली आहे. तसेच राजेंद्र दामोदर साळुंखे सर रा. करमाळा यांच्याकडून रुपये ११०००/- रोख (आकरा हजार रु.फक्त ) देणगी प्राप्त झाली आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर, प्रशासनाधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे, मंदिर पुजारी, रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. 

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोद्धाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले.

श्री कमलादेवी मंदिर समितीस देणगी दारांना ८०जी कलमान्वये आय कर मधून सवलत मिळत आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *