जेऊर प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड जेऊर यांच्यावतीने संत गाडगे बाबा यांची जयंती संभाजी ब्रिगेड कार्यालयात मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना हेमंत शिंदे म्हणाले गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिलह्यातील शेणगाव येथे झाला.

त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. अज्ञात, अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा विरोध कीर्तनाद्वारे लोक जागृती चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, देवा धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, देव दगड-धोंड्यात नसून माणसात आहे. अस्पृश्यता पाळु नका, घरदार सोडुन अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. गावात

कोणाचे काही अडले नडले कोठेही काही काम करावयाचे असले की गाडगे महाराज स्वतःहुन पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटुन केली पाहिजेत. हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकऱ्यांना शिकवला व महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत- महात्मे होऊन गेले. संत गाडगे बाबा हे त्यापैकी एक असे. ते म्हणाले यावेळी उपस्थित

पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक बाळासाहेब तोरमल, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, आदिनाथ माने, पिंटू जाधव, सागर लोंढे, अजित

उपादे, निलेश घाडगे, अविनाश घाडगे, बाळासाहेब गरड, धन्यकुमार गारुडे, किशोर कदम इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *