करमाळा प्रतिनिधी

मांजरगाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच पासून सदस्या महिला असून सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांना मांजरगाव ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिले आहे. आमच्या गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही सर्वजणी

ग्रामस्थांच्या संपूर्ण सहयोगाने आटोकाट प्रयत्न करत आहोत मात्र मांजरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करून गावातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली जात आहे. दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

नवीन पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. मांजरगाव आणि पंचक्रोशीला या अवैध दारू धंद्याच्या त्रास होत असून गावात भांडणे मारामाऱ्या वाढत आहेत.

तरी कृपया आमच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन गावांमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर तात्काळ कठोर कार्यवाही करावी व अवैध दारू विक्रीला आळा घालावा असे निवेदन सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच मनीषा आरकिले, सदस्य

रुपाली बिराजदार, रुक्मिणी चौधरी, काजल खरात, गीता काळे, मालन मोरे, संगीता चव्हाण, ग्रामस्थ, अभिजित चव्हाण, ममता साळवे यांनी तहसीलदार करमाळा यांना दिले आहे.

यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

माहितीसाठी प्रत पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, पोलीस उपअधिक्षक करमाळा, पोलिस निरीक्षक करमाळा, गटविकास अधिकारी साहेब (वर्ग-१) पं.स. करमाळा यांना पाठविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *