करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही भारत विरुद्ध इराण भव्य कुस्तीचा आखाडा जीन मैदान करमाळा येथे शुक्रवार दिनांक एक मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता भव्य कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला असून याचा सर्व कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा असे आव्हान करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पैलवान सुनील बापू सावंत यांनी आवाहन केले आहे.

यावेळी सावंत म्हणाले की जय बजरंग बली च्या कृपेने व हनुमान जयंतीचे अवचित साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारत देशातील तसेच इराणमधील नामवंत पैलवानांना आमंत्रित करण्यात

आले आहे. यामध्ये नंबर एक ची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफी विरुद्ध पैलवान हादी इराणी नंबर दोन ची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर तसेच उपमहाराष्ट्र केसरी पैलवान गणेश

जगताप पैलवान माहदी इराणी, तसेच नेपाळ चा कुस्तीतील जादुगीर पैलवान देवा थापा, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनिल जाधव, पैलवान हितेश पाटील, पैलवान अमित लखा हरिद्वार तसेच अनेक नामवंत पैलवानाचे कुस्त्यां होणार असून 51

रुपयेपासुन ते 5001रुपये पर्यंत च्या कुस्ती सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत सावंत गल्ली येथील सावंत तालीम येथे नेमल्या जातील यावेळी मैदानावर प्रेक्षणीय व चित्रथरार  कुस्त्यांचे  आयोजन करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पैलवान दादासाहेब इंदलकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन मालक गायकवाड, मनसेचे शहर प्रमुख नानासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते विनय महानवर, पैलवान नागेश सूर्यवंशी (कसाब),  पैलवान गणेश सावंत, पैलवान तुकाराम इंदलकर, पै. गणेश आडसुळ परिश्रम घेत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *