
करमाळा प्रतिनिधी
कुंभेज येथे पवार वस्ती अंगणवाडी च्या वतीने शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ व्यक्ती शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी शिवाजी

महाराज यांच्या प्रतिमेचे फुले वाहुन पुजा केली. यावेळी उपस्थित वि. का. से. सोसायटीचे चेअरमन सौदागर सुर्वे, भारत पवार, सुनिल भोसले, रामेश्वर पवार, बबलु भोसले, हरिभाऊ भोसले, सोमनाथ मुटके, महावीर भोसले, शंकर पवार, अंगणवाडी

सेविका आशाताई चांदणे, मदतनीस मंगल शिंदे व विद्यार्थी यांच्या समवेत शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच कुंभेज गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदणे वस्ती येथे ही शिवजयंती मोठ्या

उत्साहाने साजरी करण्यात आली. कुंभेज शाळेतील मुख्यध्यापीका निमगिरे मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी समवेत मुलांना खाऊ वाटप करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच चांदणे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजयंती साजरी केली.


