
करमाळा प्रतिनिधी
पंचक्रोशीतील शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाराजांच्या पूजनासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
मनीषा लोंढे, अंजली लोंढे, जयंती इंगोले, हिंदवी साबळे, यश करे, विराज बादल यांनी भाषणाद्वारे आपले शिव विचार व्यक्त केले, या सर्व बाल शिव विचारवंतांना नितीन खटके यांच्या हस्ते तुकोबा ते शिवबा हे वैचारिक पुस्तक देऊन व शिवजयंती

कमिटी कोंढेज यांच्या वतीने आकर्षक बक्षीस देण्यात आले, तसेच आदलिंग गुरुजी यांनी देखील शिव विचार व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देश सेवा बजावून आलेले इंडियन आर्मी चे मेजर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या मध्ये आजी माझी सैनिक करमाळा तालुका उपाध्यक्ष रवींद्र सव्वाशे, तसेच मुलानी मेजर, सोमनाथ शिरसकर, अनिल दौंड, सुरेश

आदलिंग, शिवणे उपस्थित होते.
तसेच संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नितीन खटके, उदयसिंह देशमुख कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

सर्व ग्रामस्थांना व शिवप्रेमींना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

