कुर्डूवाडी प्रतिनिधी

पडसाळी (ता.माढा) येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त पशुपालक 125 शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप.

पडसाळी (ता. माढा) येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर व ग्रामपंचायत पडसाळी यांचे संयुक्त विद्यमाने माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त चारा निर्मिती करण्यासाठी पशुपालक

125 शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप माजी सरपंच दत्तानाना फरड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पं. स. कुर्डूवाडी डॉ. आय. डी. शेख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विविध विषयावर

सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर वाटप करणार असलेले मका बियाण्यांची कशी लागवड करावी. याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सचिन मोरे यांनी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून राबवल्या जाणाऱ्या योजना विषयी सविस्तर माहिती

दिली. पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी सांगितले की, गावाचे सहकार्य असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक योजना कार्यक्रम गावात राबवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपले सहकार्य असेच राहू द्या. त्याचबरोबर पशुसंवर्धन

विभागाकडून केलेल्या सहकार्याबद्दल आभार सरपंच योगेश पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी उपसरपंच प्रतिनिधी चंद्रकांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब मुटकुळे, विष्णू काका फरड, कुर्मदास पाटील, माजी उपसरपंच भारत देशमुख,

तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, भरत पाटील, उमेश मुटकुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबा शिंगाडे, प्रवीण पाटील, महावीर आबा मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, पिंटू सलगर, विलास देशमुख, विजय सुर्वे, दत्तात्रय माळी, समाधान मुटकुळे,

समाधान सलगर, विशाल पाटील, सुरेश देशमुख, नामदेव मुटकुळे, सिद्धेश्वर देशमुख यांच्यासह पशुधन पालक व शेतकरी उपस्थित होते. यावेळी डॉ. अमित लेंडवे यांनी विशेष सहकार्य केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *