करमाळा प्रतिनिधी

रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समितीची बैठक आज 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जुने विश्राम करमाळा येथे पार पडली. यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी

उपस्थित होते. या बैठकीमध्ये जर रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस येथे आठवडाभरात मुख्यमंत्री महोदय यांनी वेळ देऊन या योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर या चाळीस गावातील जनता शंभर टक्के

बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात ग्रामपंचायत पोथरे व ग्रामपंचायत पिंपळवाडी या दोन गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या संदर्भातील निर्णय ग्रामसभेत झाल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी वेळ

न दिल्यास चाळीस गावातील सरपंच व प्रमुख पदाधिकारी 100 गाड्या घेऊन मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत तसेच पुढील कालावधीमध्ये जर शासनाने अशी डोळेझाक चालू ठेवली तर लोकसभा निवडणुकीत नेतेमंडळींना प्रचारासाठी

गाव बंदी सुद्धा करण्यात येणार आहे. याबाबत ही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपसा सिंचन संघर्ष समितीचे सदस्य अंजनडोह चे माजी सरपंच शहाजी माने, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, पिंपळवाडी चे माजी सरपंच मदन पाटील, वीटचे

सरपंच महेश गणगे, रावगावचे सरपंच रोहणी शेळके, रावगाव उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, राजूरी सरपंच भोसले, विहाळ सरपंच पूजा मारकड, अंजनडोह सरपंच पल्लवी शेळके, झरेचे सरपंच सुनिता कांबळे, उपसरपंच मंजूश्री मुसळे, वंजारवाडी

सरपंच प्रतीक्षा बिनवडे,  पोंधवडी सरपंच मनोहर कोडलिंगे, कोर्टी उपसरपंच झाकणे, वीट ग्रामपंचायत सदस्य गोरख ढेरे, झरे माजी सरपंच प्रशांत पाटील, विठ्ठल शिंदे, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, माजी सरपंच अरूण शेळके, सुभाष बलदोटा, हिवरवाडी सरपंच बापु पवार, पिंपळवाडी उपसरपंच वैशाली चव्हाण, बंडू घाडगे, झरे जीवन होगले, घारगाव भीमराव घाडगे, किसन धायतोंडे, विठ्ठल शिंदे, अंकुश जाधव, संदीप शेळके, राजेंद्र भोसले, सागर शिंदे, कामुने उमेश शिंदे, गणेश शिंदे, विशाल परदेशी, रामचंद्र बर्डे, संजय कांबळे, शत्रुघन वाघ, मोहन मारकड यासह विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *