करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरांमध्ये छत्रपती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर करमाळा शहर व तालुक्यातील शाळांनी व विविध स्पोर्ट क्लबच्या

संघाने सहभाग नोंदवला, लेझीम नृत्य साजरे केले. सिद्धार्थ स्पोर्ट क्लब सिद्धार्थ नगर यांनी लेझीम नृत्य साजरे केले. दुर्गाव वाहिनी मर्दानी खेळ सुतारगल्ली यांनी सुद्धा मर्दानी खेळाचे सादरीकरण छान केले. त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब करमाळा मल्लखांब

यांनी रोप मलखंब व दांडी मलखांब यावरती जबरदस्त प्रात्यक्षिक साजरे केले. वीर शिवाजी महाराजांनी खेळ यांनी दांडपट्टा व तलवारबाजी असे विविध प्रकारचे प्रत्यक्षीक साजरे केले व उपस्थित सर्व शिवभक्तांचे वरील सर्व संघांनी मने जिंकली व अतिशय छान आणि सुंदर प्रात्यक्षिके त्या ठिकाणी साजरे केले.

तसेच छोट्या छोट्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपापले मनोगत व्यक्त केली. सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यामध्ये विविध वाद्य डीजे व बँड तसेच शेटफळ येथील नामांकित लेझीम संघ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवत मिरवणुकीची शोभा वाढवली.

वरील सर्वांनी जो सहभाग नोंदवला त्या सहभागाबद्दल शिवजयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले तसेच सहभागी लेझीम संघ व मर्दाळे मर्दानी स्पोर्ट क्लब तसेच वाद्य बँड व डीजे यांना शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला व उपस्थित सर्व शिवभक्तांचे आभार शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मानण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *