करमाळा प्रतिनिधी

गौंडरे तालुका करमाळा येथील मूळ रहिवासी कमलाकर (काका) गजानन जोशी यांचा मुलगा अमित पदवी मध्ये महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्रथम आल्याबद्दल पदवी वितरण सोहळ्या दरम्यान येथे त्यांचा पद्मश्री डॉ. अशोक काका कुकडे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त, लातूर येथे दिनांक 13/2/2024 रोजी पदवी वितरण सोहळा पार पडला. त्यात चिरंजीव अमित जोशी यांना वाणिज्य शाखेतून 9.26 गुण मिळाले असून तो महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *