
करमाळा प्रतिनिधी
रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडिया (आ) या पक्षाची सोलापूर जिल्हा मेळाव्या संदर्भात प्रमुख पदाधिकारी यांची मिटींग अर्जुनराव गाडे सोलापूर जिल्हाऊपाध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी दि. 25 फेब्रुवारी सोलापूर येथे

रिपब्लीकण पक्षा चा जिल्हा मेळावा राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थित व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार.

तसेच यावेळी मिटींग मध्ये गाव तेथे शाखा व पक्षाचे क्रियाशिल सभासद वाढविने तसेच जिल्हा मेळाव्याला जाण्यासाठी गाड्याची व्यावस्था करणे या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी मिटींगचे अध्यक्ष करमाळा तालुका अध्यक्ष अमोल कदम,

धनगर आघाडीचे जिल्हा नेते बाळा टकले, कामगार आघाडीचे पश्चीम महाराष्ट्राचे नेते यशवंत गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सरतापे, माजी कृषी अधिकारी दत्ता गाडे, आरपीआय भोई समाजाचे नेते बबन सल्ले, मनोहर शिंदे, लक्ष्मण शिंदे, विठ्ठल कदम, रघुनाथ थोरात, शहाजी धेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

